रिक्षाचालकाच्या मृत्यूप्रकरणी टपरीचालकाविरुद्ध गुन्हा

By admin | Published: April 27, 2017 05:18 AM2017-04-27T05:18:52+5:302017-04-27T05:18:52+5:30

भिशीच्या पैशावरुन झालेल्या वादावादीत ढकलून दिल्याने खाली पडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला़ याप्रकरणी खडक पोलिसांनी

Crime against a trucker in the death of the autorickshaw driver | रिक्षाचालकाच्या मृत्यूप्रकरणी टपरीचालकाविरुद्ध गुन्हा

रिक्षाचालकाच्या मृत्यूप्रकरणी टपरीचालकाविरुद्ध गुन्हा

Next

पुणे : भिशीच्या पैशावरुन झालेल्या वादावादीत ढकलून दिल्याने खाली पडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला़ याप्रकरणी खडक पोलिसांनी टपरीचालक विलास शिवराम देशमुख (वय ६३, रा़ भारती विद्यापीठ) यांच्याविरुद्ध मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना शुक्रवार पेठेतबुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडली़
प्रकाश शिवराम मालुसरे (वय ६०, रा़ निगडे, ता़ भोर) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे़ याप्रकरणी त्यांचा पुत्र श्रीकांत मालुसरे यांनी खडक पोलिसाकडे फिर्याद दिली आहे़ शुक्रवार पेठेतील संपदा बँकेसमोर प्रकाश मालुसरे हे रिक्षा लावून चहा पिण्यासाठी देशमुख यांच्या टपरीवर गेले होते़ त्या ठिकाणी मालुसरे व देशमुख यांच्यात भिशीच्या पैशाच्या कारणावरुन वाद होऊन धक्काबुक्की झाली़ मालुसरे यांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे, हे माहिती असतानाही देशमुख यांनी मालुसरे यांना ढकलून दिल्याने ते खाली पडले व त्यातच त्यांना मृत्यु झाला़ पोलिसांनी मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Crime against a trucker in the death of the autorickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.