कोरोना नियम न पाळल्याने नवरदेवासह वरपित्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:28+5:302021-03-17T04:11:28+5:30
पिंगळवाडी येथील नवरदेव गणेश रोहिदास खुटाण, लग्न कार्यप्रमुख रोहिदास देवराम खुटाण, डीजे व ऑपरेटर विशाल नारायण बोऱ्हाडे, गणेश सदाशिव ...
पिंगळवाडी येथील नवरदेव गणेश रोहिदास खुटाण, लग्न कार्यप्रमुख रोहिदास देवराम खुटाण, डीजे व ऑपरेटर विशाल नारायण बोऱ्हाडे, गणेश सदाशिव फलके (रा. आमोंडी) यांच्यावर विनापरवाना वरात काढली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार पोलीस शिपाई अमोल काळे यांनी केली आहे.
रोहिदास खुटाण यांचे घराचे जवळ मोकळया जागेत सोमवारी (दि. १५) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास लग्नाचे वरातीनिमित्त मानवी जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची जाणीव असतानाही विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न करता सुमारे १५० ते २०० लोक जमवून वेळेचे बंधन न पाळता विनापरवाना डी. जे. सिस्टीमवर कर्कश आवाजात गाणी वाजवून सर्वोच्च न्यायालयाचे अटी व शर्तीचे उल्लंघन व कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळल्यामुळे नवरदेव, लग्न कार्यमालक, डीजे मालक व ऑपरेटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप लांडे, आतिश काळे करत आहे.