पाळलेल्या मांजरींची हालअपेष्टा करणाºया महिलांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:24 AM2017-09-12T03:24:41+5:302017-09-12T03:25:06+5:30
मांजर, कुत्रा पाळणे हे आता शहरांमध्ये स्टेटस सिम्बॉल बनत चालले आहे़ पण स्वत:च्या हौसेखातर सोसायटीतील इतर रहिवाशांना किती त्रास होतो, याचा अनेक जण विचारच करत नाही़ एकवेळ एक-दोन प्राणी पाळणे समजू शकेल, पण तब्बल २० ते २५ मांजरी पाळल्या तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरे.
पुणे : मांजर, कुत्रा पाळणे हे आता शहरांमध्ये स्टेटस सिम्बॉल बनत चालले आहे़ पण स्वत:च्या हौसेखातर सोसायटीतील इतर रहिवाशांना किती त्रास होतो, याचा अनेक जण विचारच करत नाही़ एकवेळ एक-दोन प्राणी पाळणे समजू शकेल, पण तब्बल २० ते २५ मांजरी पाळल्या तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरे़ इतक्या मांजरी एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवल्याने त्यांच्या मलमूत्रामुळे दुर्गंधी सुटून इतर रहिवाशांना त्रास होऊ लागला़ शेवटी कोंढवा पोलिसांनी या मांजरी पाळणाºया दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
दीपिका कपूर व संगीता कपूर (रा़ ब्रम्हा होरिझन सोसायटी, कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्यावर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे़ याप्रकरणी अॅनिमल वेलफेअर अधिकारी मेहेर मथरानी (वय ५३, रा़ उदयबाग, सोपानबाग) यांनी फिर्याद दिली आहे़
याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले, की दीपिका व संगीता कपूर यांचा ब्रम्हा होरिझन सोसायटीत एक फ्लॅट आहे़ त्यात त्यांनी नोव्हेंबर २०१४ पासून मांजरी पाळण्यास सुरुवात केली़ पुढे त्यांची संख्या वाढत गेली़ सुरुवातीला त्या दोघी त्या फ्लॅटमध्ये राहत होत्या़
या मांजरीची संख्या वाढत जाऊन ती २० ते २५ पर्यंत पोहोचली़ त्यामुळे त्यांचे मलमूत्र फ्लॅटमध्येच होत होते़ स्वच्छता न केल्याने याचा या दोन्हींना त्रास होऊ लागला़ तेव्हा त्यांनी सुमारे एका वर्षापूर्वी जवळच भाड्याने फ्लॅट घेऊन तेथे राहू लागल्या़ या मांजरींना फ्लॅटमध्ये कोंडून ठेवल्याने त्यांची हालअपेष्टा होऊ लागली. स्वच्छता न केल्याने शेजारी राहणाºया इतर फ्लॅटधारकांना त्याच्या दुर्गंधीचा त्रास होऊ लागला व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला़ त्यामुळे रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली़
दरम्यान, ही बाब अॅनिमल वेलफअर अधिकारी मेहेर मथरानी यांना समजली़ त्यांनी तेथे जाऊन पाहणी करून कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़