बलात्कार प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:08 AM2018-08-29T00:08:48+5:302018-08-29T00:09:34+5:30

लोणी काळभोर : आठ तासांत अटक

Crime against youth in rape case | बलात्कार प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा

बलात्कार प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा

Next

लोणी काळभोर : घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या एक वर्षापासून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तातडीने हालचाली करत गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ तासांच्या आत त्याला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी संतोष गायकवाड (वय ३२, रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) याला जालना येथून अटक केली आहे. या संदर्भात घटस्फोटित महिलेने तक्रार दाखल केली आहे. संतोष गायकवाड विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर सदर महिला आईवडिलांसोबत माहेरी राहात आहे. उदरनिर्वाहासाठी ती एका ठिकाणी कामाला जाते. कामाच्या ठिकाणी या महिलेची व संतोष गायकवाडची ओळख झाली होती. संतोषने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. महिलेने माझे लग्न झाले असून, मला एक मुलगी आहे अशी माहिती त्याला दिली होती. तरीही आपण लग्न करू असे आश्वासन त्याने महिलेला दिले होते. एप्रिल २०१७ मध्ये संतोष काही तरी काम काढून महिलेच्या घराजवळ आला होता. त्या वेळी त्याने बोलण्यासाठी म्हणून तिला बोलावून, लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही वेळोवेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. त्यामुळे ती संतोषला लग्नाबाबत सतत विचारणा करू लागली. या गोष्टीला वैतागून संतोष त्याच्या सासुरवाडी जालना या ठिकाणी राहायला गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले, हवालदार नितीन सुद्रिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime against youth in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.