लोणी कोळभोर येथे वीज चोरी करणा-या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 07:42 PM2018-06-30T19:42:42+5:302018-06-30T19:44:16+5:30
अनधिकृतरित्या वीज पुरवठा घरात जोडून वीज वापराची नोंदणी मिटरवर होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले.
लोणी काळभोर : गेल्या दोन वर्षांपासून वीज मिटरच्या आत जाणा-या खोक्याच्या मागे छिद्र करून वायर जोडत अनधिकृतरित्या वीज पुरवठा घरात जोडून वीज वापराची नोंदणी मीटरवर होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी करणा-या पती - पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरारी पथक कृष्णानगर, सातारा चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवाशिष चित्तरंजन दत्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, महिंद्र लक्ष्मण चोरघे ( वय ४५ ) व मंगल चोरघे ( वय ४०, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली ) या पती - पत्नी विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता यांचेकडे महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या मीटर व जोडभाराची तपासणी करणे, वीजचोरी करणा-या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, अनधिकृत वापरांस अटकाव करणे. आदी कामे सोपवली आहेत.
काही दिवसांपूर्वी सदर पथक कुंजीरवाडी परिसरातील मीटरची तपासणी करत असताना चोरघे यांचे घरी गेले असता त्यांना त्याठिकाणी दोन मीटर दिसले. तपासणी केली असता या दोन्ही मीटरच्या आत जाणा-या खोक्याच्या मागे छिद्र करून वायर जोडून अनधिकृतरित्या वीज पुरवठा घरांत जोडून वीज वापराची नोंदणी मिटरवर होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले. कायदेशीर कारवाई करून मिटर सिल करण्यात आले. पथकाने वीजचोरीची पडताळणी केली असता त्यांना गेले दोन वषार्पासून सदर चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये मछिंद्र चोरघे यांनी १ लाख ३३ हजार ९०६ रुपये किमतीची ९८७० युनिट तर मंगल चोरघे यांनी १ लाख १९ हजार ४३ रुपये किमतीची ९७४३ युनिट वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या पथकाने तडजोडीची रक्कम म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये भरण्यांस सांगितले. परंतु, ते न भरलेले शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.