बंदी असतानाही हॉटेल सुरू ठेवल्या प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:39+5:302021-01-20T04:13:39+5:30
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने सोमवारी १८ ते १९ जानेवारी सकाळी सहा ...
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने सोमवारी १८ ते १९ जानेवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हॉटेल, धाबे, खानावळी, चायनीज, पानटपरी इत्यादी सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याबाबत मंचर पोलिस ठाण्याच्या वतीने सर्वत्र ही माहिती देण्यात आली होती. तरीही काही आस्थापने चालू राहिली. त्याविरोधात कारवाई करत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील अवसरी खुर्द हद्दीत महेश शरद भोर (रा.तांबडे मळा) यांनी शिवनेरी मिसळ हाऊस चालू ठेवले होते. अवसरी खुर्द हद्दीत संकेत चंद्रकांत भोर (रा. भोरवाडी ) यांनी सद्गुरू हॉटेल चालू ठेवल्याबद्दल, अवसरी खुर्द गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर गौरव गोरख चव्हाण (रा.हनुमंतखेडा सध्या रा.अवसरी खुर्द) त्यांनी शाही मेजवानी हॉटेल चालू ठेवल्याबद्दल, अवसरी खुर्द गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर संदीप वसंत झुजम (रा.राजगुरुनगर) यांनी चवदार कोकण हॉटेल चालू ठेवल्याबद्दल, पुणे नाशिक महामार्गावरील मंचर गावच्या हद्दीत निलेश दिगंबर डावखरे (रा. मंचर) यांनी महाराणा हॉटेल चालू ठेवल्याबद्दल, कळंब गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर विनोद विठ्ठल भालेराव (रा.कळंब ) यांनी आप्पाचा ढाबा चालू ठेवल्याबद्दल या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तर पुणे नाशिक महामार्गावरील कळंब येथील दत्तात्रय काशिनाथ साळवे (रा.कळंब ) यांनी कमलजा पान स्टॉल चालू ठेवल्याबद्दल तसेच पेठ गावच्या हद्दीत असणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरील चंद्रणील हॉटेल समोरील पानटपरी चालू ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.