भर लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुबाडले, रस्त्यावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यात होतेय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:18 PM2020-09-06T14:18:15+5:302020-09-06T14:20:35+5:30

तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, खिशातील रोख रक्कम, सोन्याचे कडे असा २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुबाडून नेला.

crime cases increasing in pune | भर लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुबाडले, रस्त्यावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यात होतेय वाढ

भर लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला लुबाडले, रस्त्यावरील जबरी चोरीच्या गुन्ह्यात होतेय वाढ

Next

पुणे - पुणे शहराची शान म्हणून ओळखला जाणारा रोड, सततची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर तीन जणांनी एका तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, खिशातील रोख रक्कम, सोन्याचे कडे असा २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुबाडून नेला. शहरात अनलॉकमध्ये रस्त्यावरील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याप्रकरणी जितेंद्र रुपचंद राठोड (वय ३०, रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राठोड हे ४ सप्टेंबरला रात्रीसाडेबारा वाजता लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ बडोदासमोर मोटार उभी करुन थांबले होते. यावेळी तीन जण एका मोपेडवरुन आले. त्यांच्यातील एकाने राठोड यांची कॉलर पकडून येथे कशाला आला आहेस, बाया बघायला का? असे विचारले. दुसर्‍याने त्यांच्या गळ्यातील २३ ग्रॅमची सोनसाखळी, ४० ग्रॅमचे सोन्याचे कडे तसेच खिशातील रोख रक्कम व कार्ड असलेले पाकीट असा २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर ते मोपेडवरुन सेवासदन चौकाच्या दिशेने पळून गेले.

गेल्या काही दिवसात रात्री रस्त्याने जाणार्‍यांना दुचाकीवरुन येणार्‍या चोरट्यांनी लुटण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. स्वारगेट येथील कोथरुड बसथांब्यावर थांबलेल्या नागेश गुंड (वय ३७) याने विरोध केल्याने चोरट्यांनी खून केल्याची घटना ताजी आहे. या चोरट्यांचा अद्याप शोध लागला नाही. त्याच्या अगोदर राष्ट्रभूषण चौकात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करुन त्यांचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. शनिवारी रात्री कार्यालयात जात असलेल्या एका सुरक्षारक्षकाला मारहाण करुन त्याला लुटण्याची घटना सादलबाबा चौकाजवळ घडली.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्...

CoronaVirus News : ऑनलाईन क्लास दरम्यान प्राध्यापिकेची तब्येत बिघडली, कोरोनामुळे विद्यार्थ्यांसमोर झाला मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढला; धडकी भरवणाऱ्या आकडेवारीने रेकॉर्ड मोडला

बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video 

"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Web Title: crime cases increasing in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.