मजूर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा

By admin | Published: September 26, 2015 01:54 AM2015-09-26T01:54:19+5:302015-09-26T01:54:19+5:30

पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर या गृहपकल्पावर काम करणारी मजूर महिला डोक्यात लाकडी वासा पडून ठार झाली.

Crime in the death of a labor woman | मजूर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा

मजूर महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा

Next

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर या गृहपकल्पावर काम करणारी मजूर महिला डोक्यात लाकडी वासा पडून ठार झाली. या घटनेची नोंद आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. दबावामुळे पोलिसांना कारवाई करणे अडचणीचे झाले असताना, ‘लोकमत’मधील वृत्तानंतर पोलिसांची धावपळ उडाली. अखेर तब्बल तीन दिवसांनी सांगवी पोलिसांनी या प्रकरणी बांधकाम व्यावसायिका कडील ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लाकडी वासा खाली काम करीत असलेल्या महिलेच्या डोक्यात पडला. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये, याची दक्षता घेण्यात आली. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली. प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या अन्य मजुरांना लगेच सुटी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेऊ नये, याकरता दबाव तंत्रांचा अवलंब करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक, संबंधित ठेकेदाराने कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा साधने पुरवली नसल्याचे उघड होईल. निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला, ही बाब निदर्शनास आली, तर कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. महिलेच्या वारसांना, कुटुंबीयांना भरपाई द्यावी लागेल. हे सर्व टाळण्यासाठी कोणालाही काही समजण्याच्या आत परस्पर प्रकरण मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला. लोकमतच्या वृत्तानंतर शुक्रवारी सायंकाळी पिंपळे सौदागर पोलीस चौकीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल
करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Crime in the death of a labor woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.