क्राईम डायरी - डेपोजवळच्या मृतदेहाची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:53 AM2019-02-22T02:53:14+5:302019-02-22T02:53:38+5:30

कोथरूड कचरा डेपोजवळची घटना

Crime Diary - The identity of the dead body of the deceased was identified | क्राईम डायरी - डेपोजवळच्या मृतदेहाची ओळख पटली

क्राईम डायरी - डेपोजवळच्या मृतदेहाची ओळख पटली

Next

पुणे : कोथरूड कचरा डेपो येथे पाय बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह १५ फेब्रुवारी रोजी आढळून आला. काम देण्याच्या बहाण्याने एक व्यक्ती दुचाकीवरून घेऊन गेला होता. त्यानंतर गळा दाबून खून करून मृतदेह पोत्यात बांधून फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. त्या मृतदेहाची ओळख पटली आहे.

सुभाष गोंविद जोरी (वय ५०, रा. दोस्ती गु्रपजवळ, किष्किंधानगर, कोथरूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहे.
कोथरूड कचरा डेपोच्या परिसरात मागील १५ रोजी एका ५५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा पाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे शर्ट व पँट होती. कोथरूड पोलिसांनी तपास केला असता तो मृतदेह किष्किंधानगर येथील सुभाष जोरींचा असल्याचे उघडकीस आले. जोरी यांना ६ फेबु्रवारी रोजी सायं. साडेपाचच्या सुमारास एका अज्ञात व्यक्ती माळी काम करायचे आहे, असे सांगून दुचाकीवरून घेऊन गेला होता. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी मृतदेह धनलक्ष्मी अपार्टमेंट परिसरातील मागील बाजूस उतारावर आढळला होता. मृतदेहाचे शवविच्छेन केले. त्यामध्ये गळा दाबून खून केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बलात्कार केल्याप्रकरणी बापाला कोठडी
पुणे : दारूच्या नशेत चाकूचा धाक दाखवून पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापाला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी पोलिसांनी ३८ वर्षीय बापाला अटक केली. याबाबत पीडित १४ वर्षीय मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. २० फेब्रुवारी २०१९ रोजी ही घटना घडली. फिर्यादी या मजुरीचे काम करतात. काम संपवून त्या घरी परतल्या असता घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. त्या वेळी त्यांची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरामध्ये रडत बसल्याचे पाहिले. फिर्यादींनी तिच्याकडे विचारणा केली असता, वडील दारू पिऊन घरी आले. त्यानंतर त्यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याचे सांगितले.
मदत करण्याच्या बहाण्याने केली फसवणूक
पुणे : बँके त पैसे भरण्याकरिता गेलेल्या एका महिलेचा विश्वास संपादन करून तिला पैसे मोजण्याकरिता मदत करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी व्यक्तींकडून तिची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका महिलेने (वय ६२, रा. चतु:शृंगी) चतु:शृंगी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला बुधवारी सकाळी रत्ना हॉस्पिटलच्या समोरील विद्या सहकारी बँकेत पैसे भरण्याकरिता गेली. त्या व्यक्तीला खात्यावर २५ हजार रुपये भरायचे होते. त्या वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी तिच्या हातातील २५ हजारांची रक्कम मोजण्याच्या बहाण्याने घेतली. त्यातील १० हजार काढून घेऊन तिची फसवणूक केली.
 

महिला पोलीस हवालदाराशी वाद घालणाºयास अटक
पुणे : घोले रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या समोर आपली जबाबदारी पार पाडणाºया वाहतूक विभागाच्या महिला पोलीस हवालदार यांना धमकी देत वाद घातला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अक्षय हनुमंत गायकवाड (वय २८, रा. चांदखेड, ता. मावळ) याला अटक केली आहे. आरोपीने वाहतूक विभागाच्या महिला पोलीस हवालदाराशी वाद घालून नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करू न देता, सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत संबंधित महिला पोलीस हवालदारांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Crime Diary - The identity of the dead body of the deceased was identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.