भोसरीत गुन्हेगारी वाढली : विलास लांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:19 PM2018-04-11T14:19:17+5:302018-04-11T14:19:17+5:30
नागरिकांना १५ वर्ष मुलभूत सोयी-सुविधांची कमतरता पडू दिली नाही. विकासकामे करूनही शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले आहे. याचे दु:ख वाटते.
पिंपरी : भोसरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. लोक याविषयी काही बोलत नाहीत. गप्प बसत आहेत. वाढत्या भाईगिरीमुळे शहराचा बिहार होतो की काय? अशी भीती वाटत आहे. हे वातावरण निर्माण करणाऱ्यांनी असे करणाऱ्यांनी याचा विचार करावा. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही, असा हल्लाबोल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. भोसरीतील हल्लाबोलच्या सभेत विलास लांडे यांनी गुन्हेगारीवर भाष्य केले.
लांडे म्हणाले,पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. उड्डाणपूल, नाट्यगृहे, प्रशस्त रस्ते, उद्याने राष्ट्रवादीने विकसित केली आहे. १५ वर्ष नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधांची कमतरता पडू दिली नाही. विकासकामे करूनही शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले आहे, याचे दु:ख वाटते. परंतु, शहरवासियांनी ज्यांना सत्ता दिली. त्यांना पालिका नीट चालविता येत नाही.गेल्या चार वर्षात काय काम झाले ही शहरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. गेली चार वर्ष शांत बसलो होतो एक शब्दही बोललो नाही. आता ख-या अर्थाने बोलण्याची वेळ आली आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. दुस-या पक्षात जाणार अशा वावड्या उठविल्या जातात. परंतु, राष्ट्रवादी सोडून अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाही.