एटीएसच्या उपनिरीक्षकासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:11 PM2019-04-11T12:11:41+5:302019-04-11T12:12:53+5:30

रोहिणी माने व सुभाष यादव यांनी रोल नंबर १८ या चित्रपटात काम केले आहे़.

crime registred against ATS sub-inspector and four persons | एटीएसच्या उपनिरीक्षकासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

एटीएसच्या उपनिरीक्षकासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देरोल नंबर १८ च्या नायकाचा केला छळ : सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे : विनयभंगाची तक्रार करुन रोल नंबर १८ च्या नायकाकडून खंडणी उकळणाऱ्या एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षक, अभिनेत्री आणि सराईत गुन्हेगार अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ तर, सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे (रा़ पर्वती पायथा, सहकारनगर) याला अटक करण्यात आली़ 
 दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलीस लाईन), राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर), रोहिणी मच्छिंद्र माने (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) व सारा श्रावण उर्फ सारा गणेश सोनवणे (रा. मुंबई सध्या दुबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 
याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान राम जगदाळे याच्या सहकारनगर येथील ऑफिसमध्ये घडला. यादव व आरोपी हे एकमेकांना ओळखतात. रोहिणी माने व सुभाष यादव यांनी रोल नंबर १८ या चित्रपटात काम केले आहे़. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिणी ही तेव्हापासून आपल्याशी लग्न कर, यासाठी यादव यांच्या मागे लागल्या होत्या़. पण यादव यांनी प्रतिसाद न दिल्याने रोहिणी यांनी यादव यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दिली़ होती़. यादव यांचा नृत्याचा एक व्हिडिओ माने हिने व्हायरल केला होता़. त्यावरुन यादव यांनी फिर्याद दिली होती़. तेव्हा रोहिणी हिने पोलीस उपनिरीक्षक टेकाळे याची मदत घेतली़ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता़. वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मिटवण्यासाठी राम जगदाळे याने सुभाष यादव यांना कार्यालयात बोलवून घेतले. तेथे त्याला व त्याच्या नातेवाईकांना तीन तास अटकावून ठेवून जबरदस्तीने रोहिणी माने हिचे पाय धरून माफी मागण्यास लावली व त्याचे चित्रीकरण करून १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ लाख रुपये अमोल टेकाळे यांनी स्विकारले. त्यानंतर उरलेली रक्कम न दिल्याने राम जगदाळे, अमोल टेकाळे व रोहिणी माने यांनी संगनमत करून सारा सोनवणे हिच्या मार्फतीने पाय धरून माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल  मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच टेकाळे याने त्याच्याजवळील पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची, अ‍ॅसिड टाकून मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. सुभाष यादव आणि रोहिणी माने हे दोघे १७ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या रोल नं. १८ चित्रपटातील अभिनेते अभिनेत्री आहेत. रोहिणीनीची सारा सोनवणे ही मैत्रीण आहे. तर राम जगदाळे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत.या प्रकरणी पोलीस निरीक्षक गजानन पवार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: crime registred against ATS sub-inspector and four persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.