खेड-शिवापूर येथील बॉयलरच्या स्फोटात दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 07:44 PM2019-08-26T19:44:46+5:302019-08-26T19:50:30+5:30
काही दिवसांपूर्वी वेळु येथील सीपीएच कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता...
खेड-शिवापूर : वेळु (ता.भोर) येथील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मुत्यु झाला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांनी दोन जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
अमृत बसवराज होसमानी (वय 46, रा. कोंढवा, पुणे) आणि शरद भगवान करंजे (वय 33, रा. आंबेगाव, पुणे) या कंपनी व्यवस्थापकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वी वेळु येथील सीपीएच कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. त्या स्फोटात मॅनेजर रजिंदर प्रसाद आणि विकास सिंग या दोन कामगारांचा जागीच मृत्यु झाला होता.
या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या तपासात कंपनीचे व्यवस्थापक अमृत होसमानी आणि शंकर करंजे यांनी कामगारांना अनुभव नसतांना ही वेल्डिंग करण्यास लावले होते. त्यामुळे झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यु झाला, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अमृत होसमानी आणि भरत करंजे या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.