पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टीसीवर देशद्रोहाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:22 AM2019-02-16T01:22:04+5:302019-02-16T01:22:43+5:30
लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होत असताना पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणा-या रेल्वेच्या तिकीट तपासणीसावर (टीसी) लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम १५३ बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Next
पुणे : लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा होत असताना पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणा-या रेल्वेच्या तिकीट तपासणीसावर (टीसी) लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कलम १५३ बी नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
रेल्वे प्रशासनाने तातडीने टीसीचे निलंबनही केले आहे. उपेंद्रकुमार श्रीवीर बहादुरसिंग (३९, रा. श्रीकृष्ण विहार कॉलनी, पाटणा, बिहार) असे त्याचे नाव आहे. तो लोणावळा रेल्वे स्थानकात कामाला आहे.
Junior Ticket Collector, Kumar Upendra Bahadur Singh, has been suspended by Railway. https://t.co/ft9cmsEoyG
— ANI (@ANI) February 15, 2019