शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी चोरीचा गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:23+5:302021-09-03T04:10:23+5:30

(स्टार ११३४ डमी) अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेतलेल्या विशेष मोहिमेत ५८० ...

The crime of stealing even if you take electricity from a neighbor! | शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी चोरीचा गुन्हा!

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी चोरीचा गुन्हा!

googlenewsNext

(स्टार ११३४ डमी)

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेतलेल्या विशेष मोहिमेत ५८० ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यात वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या वीजचोऱ्यांचा समावेश जास्त आहे. दरम्यान, या महिन्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सुमारे ६४ लाख ५९ हजार रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल, तर तोही गुन्हा ठरतो. अशा नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरणकडून कारवाई होऊ शकते. या कारवाईत ६४ लाख ५९ हजारांचा अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तसेच वीजचोरट्यांविरुद्ध फौजदारी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

----

* महावितरणकडून झालेली कारवाई

पुणे जिह्यात ५८० ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, ६४ लाख ५९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

-----

* कायदा काय सांगतो?

नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. सोबतच वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरू असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

---

कोट

महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील वीजचोऱ्या उघड करण्यास विशेष सहकार्य केले. उघडकीस आलेल्या वीजचोऱ्या विशेषतः सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषीग्राहकांकडील आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

- अंकुश नाळे, प्रादेशिक संचालक, महावितरण

Web Title: The crime of stealing even if you take electricity from a neighbor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.