कोरोना नियमाचा भंग करणाऱ्या दोन मंगल कार्यालयांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:40+5:302021-02-23T04:18:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: कोरोना साथरोगामुळे लग्न समारंभाला मर्यादा आल्या आहेत. मोजक्याच लाेकांत साजरे करण्यास परवानगी असताना त्याचे उल्लंघन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर: कोरोना साथरोगामुळे लग्न समारंभाला मर्यादा आल्या आहेत. मोजक्याच लाेकांत साजरे करण्यास परवानगी असताना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजगुरुनगर येथे दोन मंगल कार्यालय मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
खेड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुणांची वाढ होत आहे. प्रशासनाने नियामवली जाहीर केली आहे. मात्र, कार्यमालक आणि कार्यालय मालक प्रशासनाच्या नियामावलीचे पालन न करता लग्नसमारंभात गर्दी करत आहेत. अशा ठिकाणांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार राजगुरुनगर येथे पाेलीस अशा सभा समारंभावर लक्ष ठेवून आहेत. सोमवारी वाडा रस्त्यावरील चंद्रमा गार्डन आणि पुणे-नाशिक महामार्गावरील रिध्दीसिध्दी मंगल कार्यालयात लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पोलिसांना आढळल्याने पोलिसांनी मालकांवर आणि कार्यमालकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.
याबाबत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव म्हणाले की, यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील लग्न समारंभ, विविध कार्यक्रम तसेच अंत्यविधी, दशक्रिया विधी, राजकीय धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी २०० पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी पोलीस ठाण्याची परवानगी घेणे बधंनकारक आहे. संबंधित कार्यक्रमाचे व्हीडीओ शूटिंग करून त्याची सीडी तीन दिवसांच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या व्यापारी, दुकानदार,व्यवसायिकासह सर्व आस्थापनाना मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्या प्रवेश देणाऱ्यावर थेट कारवाईबरोबर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही चूक पुन्हा निदर्शनास आल्यास पंधरा दिवसासांठी अस्थापना सील करण्यात येणार आहे.