बेल्ह्यात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:12 AM2021-03-01T04:12:56+5:302021-03-01T04:12:56+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २७) बेल्हा (ता. जुन्नर) येथील राज दरबार मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित ...

Crime for violating corona rules in Belha | बेल्ह्यात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

बेल्ह्यात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २७) बेल्हा (ता. जुन्नर) येथील राज दरबार मंगल कार्यालयात एक विवाह सोहळा आयोजित केला होता. या मंगल कार्यालयात लग्न सोहळा पार पडत असताना मंगल कार्यालयात कार्यालयाचे मालक सुनील रामदास बडे यांनी लग्नसमारंभासाठी त्यांचे कार्यालय लग्नासाठी दिले होते. रामदास मारुती वाघ यांनी आपला मुलगा गोरक्ष व जयराम कोतू भोसले यांची मुलगी मंगल (दोन्ही रा. बेल्हे ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा विवाहसोहळ्यात जवळपास ५०० ते ६०० लोक जमले होते. वास्तविक ५० लोकांमध्येच विवाह सोहळा उरकण्याचे आदेश शासनाचे आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींचे पालन करण्यात आलेले नाही. अनेकांनी मास्क लावला नव्हता. यासोबतच शारीरिक अंतराच्या नियमांचेही पालन झाले नाही. यामुळे कार्यमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime for violating corona rules in Belha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.