नारायणगावात महिला बिल्डरवर गुन्हा
By admin | Published: March 21, 2017 05:04 AM2017-03-21T05:04:48+5:302017-03-21T05:04:48+5:30
गृहप्रकल्पातील खरेदीखत व ब्रोशर (जाहिरातपत्रक) यामध्ये उल्लेख केलेल्या सोई-सुविधा न देता रो-हाऊस व फ्लॅटधारकांची
नारायणगाव : गृहप्रकल्पातील खरेदीखत व ब्रोशर (जाहिरातपत्रक) यामध्ये उल्लेख केलेल्या सोई-सुविधा न देता रो-हाऊस व फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव येथील आेंकार श्री डेव्हलपर्सच्या संध्या शैलेश औटी यांच्याविरुद्घ फसवणूक केल्याचा गुन्हा नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर व पोलीस उपनिरीक्षक हेमंत बंगाळे यांनी दिली आहे़
नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची फिर्याद लता राजेंद्र भोर (रा़ सनसिटी दरंदळेमळा, नारायणगाव, मूळ रा़ रांजणी, ता. जुन्नर, पुणे) यांनी दिली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता भोर यांनी ओंकार श्री डेव्हलपर्स यांच्या बांधकाम साईटची जाहिरात पाहिली व त्यामार्फत बिल्डर संध्या औटी यांच्या हनुमान चौकातील ओंकार श्री डेव्हलपर्स कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता त्यांनी दरंदळेमळा येथील सर्व्हे नं़ ८२ मध्ये बांधत असलेल्या सनसिटी संकुल येथील बांधकाम साईटची माहिती दिली़ हा गृहप्रकल्प जागेचे मूळ मालक सुनील व राजेंद्र शिवाजीराव खेबडे यांच्याकडून विकसित करण्यासाठी घेतलेला आहे़
हा गृहप्रकल्प सनसिटी संकुल नावाने सुरू करण्यात आला़ सौ़ लता भोर यांनी सर्व सोई-सुविधा ऐकून दि़ १३/४/२०१५ रोजी रोहाऊसचे रजिस्टर खरेदी खत केले़ खरेदी खतात ठरल्यानुसार रक्कम अठरा लाख रुपये आऱ टी. जी़ एस़द्वारे व उर्वरित रक्कम दोन लाख अडुसष्ट हजार रोख स्वरूपात दिले़ पार्किंगसाठी वेगळे चार लाख रुपये दिले़ त्यानुसार भोर यांना आरएच २ या रोहाऊसचा ताबा देण्यात आला़ (वार्ताहर)