संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८५ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:46+5:302021-04-09T04:12:46+5:30

पुणे : शहरात विनाकारण फिरणाऱ्या ८५ नागरिकांवर पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दिवसांत गुन्हे दाखल केले आहे. तसेच विना ...

Crimes against 85 people violating curfew | संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८५ जणांवर गुन्हे

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८५ जणांवर गुन्हे

googlenewsNext

पुणे : शहरात विनाकारण फिरणाऱ्या ८५ नागरिकांवर पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दिवसांत गुन्हे दाखल केले आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्या २ हजार १९३ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात मागील शनिवारपासून सायंकाळनंतर संचारबंदी लागू केली आहे. पहिले दोन दिवस पोलिसांनी सायंकाळनंतर बाहेर असणाऱ्या लोकांना समजावून सांगितले. त्यानंतर आता ५ एप्रिलपासून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री २१ जणांवर, तर मंगळवारी रात्री ६४ जणांवर असे एकूण ८५ जणांवर पोलिसांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबरोबर ५ व ६ एप्रिल दरम्यान १ हजार ४१ आणि १ हजार १५२ असे २ हजार १९३ जणांवर विनामास्क प्रकरणी कारवाई केली आहे.

Web Title: Crimes against 85 people violating curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.