हाताला काम नसल्याने गुन्हे वाढले; येरवडा कारागृहात ५० टक्के कैदी बेरोजगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:02+5:302021-08-19T04:16:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्वात जुने आणि मोठे असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सध्या शिक्षा झालेल्या कैद्यांपैकी सर्वाधिक ...

Crimes increased due to lack of manual labor; 50% unemployed in Yerawada jail | हाताला काम नसल्याने गुन्हे वाढले; येरवडा कारागृहात ५० टक्के कैदी बेरोजगार !

हाताला काम नसल्याने गुन्हे वाढले; येरवडा कारागृहात ५० टक्के कैदी बेरोजगार !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील सर्वात जुने आणि मोठे असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सध्या शिक्षा झालेल्या कैद्यांपैकी सर्वाधिक कैदी हे खून प्रकरणात शिक्षा झालेले कैदी आहेत. त्याचबरोबर शिक्षा झालेल्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक कैदी हे बेरोजगार असताना त्यांनी गुन्हा केल्याचे आढळून आले आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृह हे राज्यात प्रमुख कारागृह असून त्या अन्य जन्मठेप व इतर दीर्घ शिक्षा लागलेल्या कैद्यांना प्रामुख्याने येथे ठेवले जाते. त्यात खून खटल्यात शिक्षा झालेल्यांमध्ये प्रामुख्याने जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्या खालोखाल चाेरी केल्याने शिक्षा झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे.

शिक्षा झालेल्यांमध्ये प्रामुख्याने ३० ते ४० वयोगटातील कमवत्या वयातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्याच्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील २९१ तरुण शिक्षा भोगत आहेत.

बेरोजगार असल्याने अनेक जण गुन्हेगारीकडे वळल्याने आढळून येते. शिक्षा झालेल्यांपैकी १११ निरक्षर असून ७३४ जण साक्षर आहेत.

..............

येरवडा कारागृहात गुन्ह्यानुसार शिक्षा झालेले कैदी

गुन्हे कैदी

खून २०२

चोरी ७९

बलात्कार २७

खुनाचा प्रयत्न ५४

हेतू नसताना खून ३७

फसवणूक २३

.............

एकूण ८४५

.............

वयोगट कैदी

१८ ते २१- १०२

२२ ते ३०- २९१

३१ ते ४०- २६५

४१ ते ५०- १११

५१ ते ६० - ६३

६० वर्षांवरील - १३

...............

एकूण ८४५

कैद्यांचे व्यवसायानुसार वर्गीकरण

शेतकरी - ४३

व्यापारी - ५७

शेतमजूर - ३४

बेरोजगार - ४३७

खासगी नोकरी - २३४

शासकीय नोकर - १९

इतर - २१

.........

एकूण ८४५

...........

Web Title: Crimes increased due to lack of manual labor; 50% unemployed in Yerawada jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.