खुनाच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 09:10 PM2018-07-16T21:10:09+5:302018-07-16T21:13:40+5:30
गणेश पेठेतील दगडी नागोबा येथे संजय म्हंकाळे याचा खून झाला होता़. त्यातील आरोपी नितीन मलजी गेली पाच वर्षे फरार होता़.
पुणे : गणेश पेठेत पाच वर्षांपूर्वी झालेल्या खुनामध्ये फरारी झालेल्या आरोपीस फरासखाना पोलिसांनी अटक केली़. नितीन संतोष ऊर्फ अभिजित मलजी (वय २४, रा़ शिवशंभो, ज्ञानदीप निवास, कात्रज कोंढवा रोड) असे त्याचे नाव आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की गणेश पेठेतील दगडी नागोबा येथे संजय म्हंकाळे याचा खून झाला होता़. त्यानंतर नितीन मलजी गेली पाच वर्षे फरार होता़. फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई रसाळ यांना माहिती मिळाली, की या गुन्ह्यातील फरार आरोपी दूधभट्टीजवळ थांबला आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस शिपाई रसाळ, सरडे, कुंभार, जगताप, खुटवड, शिंदे, हर्षल शिंदे, शंकर संपते, दिनेश भांदुर्गे, संदीप पाटील हे़ मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी गेले़ तेव्हा मिळालेल्या वर्णनाचा तरुण तेथे थांबलेला दिसला़. पोलिसांनी नितीन असा आवाज दिल्यावर त्याने मागे वळून पाहिले़. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला़ तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले़. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़. या खुनानंतर तो पत्ता बदलून धनकवडीला राहत होता़. तेथे तो भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असल्याचे त्याने सांगितले़.