मोक्यातून जामिनासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणारा गुंड निलेश बसवंत जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 09:12 PM2021-03-31T21:12:45+5:302021-03-31T21:12:55+5:30

निलेश बसवंत हा खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळ कुटंबियांना भेटण्यासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.

Criminal Nilesh Baswant arrested for obtaining fake medical certificate for bail | मोक्यातून जामिनासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणारा गुंड निलेश बसवंत जेरबंद

मोक्यातून जामिनासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविणारा गुंड निलेश बसवंत जेरबंद

googlenewsNext

पुणे : मोक्यातील गुन्ह्यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून जामीन मिळविलेल्या बापू नायर टोळीतील गुंड निलेश बसवंत याला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने खेड शिवापूर येथून अटक केली. बसवंत याच्यावर खंडणी, मारामारी, खुन असे १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा मोक्का कारवाई करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

कोंढवा पोलिसांनी बापू नायर टोळीला मोक्का लावला होता. त्यामध्ये निलेश बसवंत, अमोल बसवंत, दीपक कदम, दत्ता माने यांच्यावर गुन्हा दाखल होता. निलेश बसवंत याला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. त्याने आजारपणाचे कारण सांगून तशी कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर केली होती. त्यामध्ये सातारा येथील डॉ. अंदुरे यांचे ऑनेको लाईफ कॅन्सर सेंटरच्या नावाने प्रमाणपत्र सादर केले होते. याबाबत शंका आल्याने पुणे पोलिसांनी चौकशी केली. त्यात डॉ.अंदुरे यांनी असे प्रमाणपत्र आपण दिले नसल्याचे व ते बनावट असल्याचे सांगितले. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जामीन मिळाल्यावर तो फरार झाला होता. 

गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, निलेश बसवंत हा खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळ कुटंबियांना भेटण्यासाठी येणार आहे. योगेश जगताप यांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुकत श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली़ उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी व त्यांच्या पथकाने सापळा रचून निलेश बसवंत याला पकडले.

Web Title: Criminal Nilesh Baswant arrested for obtaining fake medical certificate for bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.