किरकोळ वादातून तडीपार गुंडाने आईच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:12 PM2020-05-12T19:12:38+5:302020-05-12T19:13:12+5:30

तुझ्यामुळे माझी पत्नी माझ्याबरोबर नांदत नाही, असे म्हणून सिमेंटचा ब्लॉक घातला आईच्या डोक्यात..

The criminal put a cement block on the mother's head from normal issue | किरकोळ वादातून तडीपार गुंडाने आईच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

किरकोळ वादातून तडीपार गुंडाने आईच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Next
ठळक मुद्देआरोपीला अटक, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : दारू पिल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून तडीपार गुंडाने स्वत:च्या आईच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार दांडेकर पूल येथे सोमवारी दुपारी तीन वाजता घडला.
दत्तवाडी पोलिसांनी नीलेश सुरेश जोगदंड (वय २८, रा. दांडेकर पूल, पेट्रोल पंपाशेजारी) याला अटक केली आहे. याप्रकरणी बायडाबाई सुरेश जोगदंड (वय ४६,रा. दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश जोगदंड हा दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, असे असतानाही तो तडीपारीचे उल्लंंघन करून पुण्यात आला होता. तो सोमवारी दुपारी दारू पिऊन घरी आला होता. त्याचा आईबरोबर वाद झाला. तेव्हा तो आईला तुझ्यामुळे माझी पत्नी माझ्याबरोबर नांदत नाही, असे म्हणून रागाच्या भरात घराबाहेर रस्त्यावर पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून आईच्या डोक्यात घातला. यामध्ये बायडाबाई या गंभीर जखमी झाल्या़ बायडाबाई यांना वाचविण्यासाठी आलेले राकेश संजय टकले
यांनाही त्याने गाडीच्या चावीने उजव्या गालावर मारहाण करून जखमी केले.या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नीलेश जोगदंडला अटक केली असून त्याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The criminal put a cement block on the mother's head from normal issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.