धक्कादायक ! रेकॉर्डवरील गुन्हेगारच वापरत होता तब्बल १३ वर्षे पोलिसांचे बनावट ओळखपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 02:19 PM2020-10-17T14:19:30+5:302020-10-17T14:20:37+5:30

दंगल, जाळपोळ, खंडणीचे आहेत गुन्हे दाखल..

The criminal on record was using a fake police identity card | धक्कादायक ! रेकॉर्डवरील गुन्हेगारच वापरत होता तब्बल १३ वर्षे पोलिसांचे बनावट ओळखपत्र

धक्कादायक ! रेकॉर्डवरील गुन्हेगारच वापरत होता तब्बल १३ वर्षे पोलिसांचे बनावट ओळखपत्र

googlenewsNext
ठळक मुद्देबनावट ओळखपत्र तयार केल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : दंगल, जाळपोळ, खंडणी मागणे असे गुन्हे असलेला पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारच पोलिसांच्या नावाचे बनावट ओळखपत्र बनवून राजरोजपणे त्याचा उपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ या गुन्हेगाराने हे ओळखपत्र २००७ मध्ये बनवून घेतले होते़ तब्बल १३ वर्षे तो ते राजरोजपणे वापर असल्याचे आढळून आले आहे. 

इम्तियाज इद्रीस मेमन (रा.तिरुपती सोसायटी, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ओळखपत्राची एक छायांकित प्रत देऊन त्याची खातरजमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या अधिकाऱ्यांनी मेमन याला बोलावून त्याच्याकडे चौकशी सुरु केली.  सुरुवातीला तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता़ त्यानंतर पोलिसांनी त्याचे रेकॉर्ड तपासल्यावर त्याच्यावर हडपसर व वानवडी पोलीस ठाण्यात दंगल, जाळपोळ, खंडणी मागणे अशा प्रकारचे ५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला आपला इंगा दाखविल्यावर त्याने त्याने आपण बनावट पोलीस ओळखपत्र तयार करुन घेतल्याचे कबुल केले. २००७ मध्ये त्याने ओळखपत्र तयार करुन त्यावर स्वत:चे नाव, स्वत:चा फोटो लावून व त्यावर स्वत:ची खरी जन्मतारीख टाकून तो राजरोजपणे त्याचा वापर करीत होता. 

बनावट ओळखपत्र तयार केल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. 
जर कोणी व्यक्ती पोलिसांचे बनावट ओळखपत्राचा वापर करीत असल्याचा संशय आल्यास आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी, संबंधित पोलीस ठाणे अथवा पोलीस नियंत्रण कक्षाशी तत्काळ संपर्क साधावा, त्याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस आयुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, उपनिरीक्षक शेंडगे, प्रदीप सर्वे, भरत रणसिंग, अहमद पठाण, दया शेगर, अंकुश जोगदंड, संजयकुमार दळवी यांनी केली. 

मेमन या बनावट ओळखपत्राचा वापर करीत असेल तर पोलिसांच्या गुन्हेगार तपासणीमध्ये ही बाब उघडकीस इतकी वर्षे कसे आले नाही़ अशी विचारणा होत आहे.

Web Title: The criminal on record was using a fake police identity card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.