पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तडीपारांसह सराईत गुन्हेगार लागले ‘गळा’ ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:15 PM2019-02-08T13:15:30+5:302019-02-08T13:21:38+5:30

कॉम्बिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यानंतर बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले.

criminals arrested in combing operations by police | पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तडीपारांसह सराईत गुन्हेगार लागले ‘गळा’ ला 

पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तडीपारांसह सराईत गुन्हेगार लागले ‘गळा’ ला 

Next
ठळक मुद्देहडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी पोलीस ठाणे आगामी लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने कारवाई

पुणे :  शहरात घडणाऱ्या गंभीर गुन्हे व आगामी निवडणूकांचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडल पाचमधील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कॉम्बिंग  ऑपरेशन राबविण्यात आले. त्यावेळी पोलिसांना रेकॉर्डवरील १५५ गुन्हेगार मिळून आले. तर तडीपारीच्या काळात शहरात आलेले व  कोयते बाळगणारे, पिस्तूल बाळगणारे व पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी मिळून आले. अशी माहिती परिमंडल पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. 
 आगामी लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने परिमंडल पाच अंतर्गत येणाऱ्या वानव़डी, मुंढवा, ह़डपसर, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या देखरेखीखाली कोंबींग परेशन राबविण्यात आले. हे कॉम्बिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सायंकाळी चारच्या दरम्यान त्यानंतर बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत राबविण्यात आले. त्यावेळी या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शस्त्रांचा वापर करून गुन्हे करणारे गुन्हेगार, जबरी चोरी, चोरी, घरफोडी करणारे, तडीपार, पाहिजे असलेले, फरार, व दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले आरोपी यांचा शोध घेण्यात आला. 
त्यावेळी पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ४७९ आरोपी तपासण्यात आले. तर त्यापैकी १५५ आरोपी मिळून आले. शुभम पवार, शेखर चन्नापा शिंगे, शिवराज माने यांच्याकडे कोयते आढळून आले़ संदीप करुल (वय २८, रा़ कोंढवा) आणि आकाश ठाकुर (वय २५, रा़ मुंढवा) यांना तडीपार केलेले असतानाही ते पुणे शहरात आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ घरफोडीच्या गुन्ह्यातील व़ॉन्टेड असलेला तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २७) याला अटक करण्यात आली.
हे कॉम्बिंग आॅपरेशन अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड व दोन सहायक पोलीस आयुक्त, ४३ अधिकारी, १५५ कर्मचारी यांच्या पथकाने केली. 

Web Title: criminals arrested in combing operations by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.