वाडा परिसरात दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:00+5:302021-06-30T04:08:00+5:30
वाडा येथे सोयाबीन व भुईमूग पेरला जातो. महागडे बियाणे घेऊनही काही उपयोग झाला नाही. दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांना ...
वाडा येथे सोयाबीन व भुईमूग पेरला जातो. महागडे बियाणे घेऊनही काही उपयोग झाला नाही. दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. जून महिना संपला तरी पाऊस काय पडला नाही. भात रोपेही लागवडीला आली आहेत; पण केवळ पावसाअभावी काही करता येत नाही.
पाऊस वेळेवर पडला तर पुढील पंधरा दिवसांत भात रोपे लावणीसाठी तयार होतील; परंतु पावसाअभावी वातावरण चिंतेचे आहे.
बरीचशी शेती कोरडवाहू क्षेत्रातील असल्यामुळे पावसाची नितांत गरज आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज देखील फोल ठरला आहे. पाऊस नसल्याने जनावरांनादेखील हिरवा चारा उपलब्ध होत नाही.
दरवर्षी जून महिनाअखेर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत होती; पण यावर्षी परिस्थिती बघता धरणात पाणीसाठा नाही. पाण्याने तळ गाठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.