कर्ज काढून उत्सव करण्यावर टीका

By admin | Published: June 24, 2017 06:08 AM2017-06-24T06:08:50+5:302017-06-24T06:08:50+5:30

सोन्याचा नांगर फिरविलेल्या पुणे शहरावर कर्ज काढून गाढवाचा नांगर फिरवला जात आहे. कर्ज काढण्यासाठी लाखो रुपये खर्चून उत्सव साजरे करण्याच्या प्रकारावर

Criticism of taking out a loan | कर्ज काढून उत्सव करण्यावर टीका

कर्ज काढून उत्सव करण्यावर टीका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोन्याचा नांगर फिरविलेल्या पुणे शहरावर कर्ज काढून गाढवाचा नांगर फिरवला जात आहे. कर्ज काढण्यासाठी लाखो रुपये खर्चून उत्सव साजरे करण्याच्या प्रकारावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली.
महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजनेसाठी २३ कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून २०० कोटी रूपयांचे कर्जरोखे मुंबई शेअरबाजारातून महापालिकेने उभारले आहेत. या कर्ज काढण्याच्या कार्यक्रमासाठी पुणे शहरातून शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबईला नेऊन उत्सव साजरा करण्याच्या प्रकरावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
कर्जरोख्यांच्या कार्यक्रमासाठी भाजपा नगरसेवकांना मुंबईची सफर घडवून आणण्यात आली आहे. मात्र कर्जरोख्यांच्या नोंदणीसाठी वाजवलेली घंटा ही धोक्याची घंटा ठरणार आहे. कर्जरोखे काढण्याऐवजी पालिकेची देणी राज्य सरकार अद्याप का देत नाही, अशी टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली. केंद्र व राज्याकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची रक्कम मिळत नसताना कर्ज काढण्यासाठी लाखो रुपये खर्चून अभूतपूर्व कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. कर्जरोख्यांचे हे पैसे वापरण्याऐवजी महापालिकेची १४०० कोटींची शिल्लक वापरावी, अशी सूचना काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. महापालिकेतील १५० अधिकाऱ्यांना मुंबईच्या कार्यक्रमासाठी का नेण्यात आले, त्याचा आदेश कुणी काढला याबाबत खुलासा करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली.

Web Title: Criticism of taking out a loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.