समिक्षकांनी आण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची दखल घेतली नाही : डाॅ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:39 PM2019-07-18T16:39:34+5:302019-07-18T16:43:58+5:30

आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात श्रीपाल सबनिस यांनी आण्णाभाऊ साठेंवर आपले विचार व्यक्त केले.

critics did not took note of anna bhau sathe's literature : dr. shripal sabnis | समिक्षकांनी आण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची दखल घेतली नाही : डाॅ. श्रीपाल सबनीस

समिक्षकांनी आण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची दखल घेतली नाही : डाॅ. श्रीपाल सबनीस

Next

पुणे : आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारीत 12 चित्रपट तयार झाले. ए.के. हनगल, बलराज सहानीं सारखे हिंदीचित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार आण्णाभाऊंच्या साहित्य प्रेमात होते. पंरतु मराठी साहित्याची समीक्षा करणाऱ्या समिक्षकांनी आण्णाभाऊंच्या साहित्याची दखल आण्णाभाऊ असताना घेतली नाही असा खेद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. 

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या संघठनेतर्फे देशात धर्म जाती भेदाच्या ताणतणावात अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतचा दिपस्तंभ या विषयावर महाचर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सबनीसांनी हे विचार मांडले.

सबनिस म्हणाले, वाटेगाव सारख्या गावांतून मुंबईत आलेल्या आण्णाभाऊंना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. रोजच्या जगण्याच्या लढाईत आण्णाभाऊंनी कष्टप्रद कामे केली. ही कामे करीत असताना कधी घाटकोपर तर कधी चेंबुर झोपडपट्टीत ते राहत होते. ही सर्व कष्टाची काम अण्णाभाऊंनी केल्याने श्रमीक, वंचित, शोषीत हा त्यांच्या विचारांचा गाभा राहिला. त्या सर्व श्रमिकांच्या हुंकार म्हणजे आण्णाभाऊंचे साहित्य होय. माकर्सवादाचा झेंडा हाती घेतल्यानंतर जातीं-पातींच्या सर्व सिमारेषा आण्णाभाऊंनी ओलांडल्या. त्यांच्या कथा, कांदबऱ्या, कवी, वगनाट्य, पोवाडे आदी साहित्य प्रकारातूंन त्यांनी सकारात्मक नायक आणि नायीका सादर केली. त्यांच्या शब्दातील ताकदीमुळे उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे रहायचे तर अन्यायग्रस्त, पिढीत शोषीतांचे रक्त खवळून उठायचे. अण्णाभाऊंनी गवाणकर, शाहीर अमर शेख यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती संग्रमात झोकुन देऊन ढोलकी आणि ढफीच्या थापावर संग्राम उभा केला. अण्णाभाऊंचे कार्यकर्तृत्व केवळ एका जाती पुरता मर्यादीत नाही. त्यांनी रशियापासून भारतातील आदीवासी भागापर्यंत मजल मारलेली दिसून येते. त्यांचे लाल बावटा पथकाने तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चाॅंदबिबि सारख्या मुस्लिम महिलेने त्यांना मुंबईत राहण्यासाठी जागा दिली. आण्णा भाऊंनी सुमारे 35 कादंबऱ्या लिहिल्या. 

Web Title: critics did not took note of anna bhau sathe's literature : dr. shripal sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.