परप्रांतीय कामगाराचा दगडाने ठेचून खून

By admin | Published: May 23, 2017 05:29 AM2017-05-23T05:29:05+5:302017-05-23T05:29:05+5:30

येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमधील खोलीसमोर एका परप्रांतीय कामगाराचा दगडाच्या

The crooked worker's crushed blood | परप्रांतीय कामगाराचा दगडाने ठेचून खून

परप्रांतीय कामगाराचा दगडाने ठेचून खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बहुमजली इमारतीच्या बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पमधील खोलीसमोर एका परप्रांतीय कामगाराचा दगडाच्या सहाय्याने खून करण्यात आला. त्याच्यासोबत असलेला त्याचा गाववाला घटना घडल्यापासून फरार आहे. मोबाईलही बंद असल्याने हा खून त्यानेच केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
शिवकुमार धनाराम साहू (वय ४१) यांचा खून झाला असून त्याचा साथीदार अशोक भागबली यादव (दोघे रा. मारो, ता. मारो, जि. बेमेतरा, छत्तीसगड) घटना घडल्यापासून फरार आहे. हे दोघे गेल्या दोन महिन्यांपासून या इमारतीच्या बांधकामाच्या वॉटरप्रूफिंगचे काम करीत होते. ते दोघेही त्याच बांधकाम साईटवर असलेल्या एका पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होते. खुनाचा हा प्रकार आज सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी, दत्तात्रय दराडे, श्रीकांत इंगवले कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी पाहणी करून साहू यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवला. काही वेळात श्वानपथक, ठसेतज्ज्ञांसमवेतपुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार गुरू गायकवाड, सुभाष राऊत, नीलेश कदम पोहोचले. घटनास्थळाला बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी भेट देऊन तपास पथकाला आवश्यक त्या सर्व सूचना केल्या.
डोक्यात मारहाण करून त्यास जखमी करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: The crooked worker's crushed blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.