खेड तालुक्यातील आंबेठाण परिसरात कडाक्याच्या थंडीने पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 07:28 PM2019-02-09T19:28:45+5:302019-02-09T19:28:57+5:30
पुणे जिल्ह्यातही चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात रात्रीच्या वेळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले.
आंबेठाण : चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये ज्वारी,हरभरा,गहू,कांदा तसेच रबी पीके करपली.यात काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.यामध्ये नुकसान झालेल्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबधित शेतकऱ्यांनी केली आहे.
उत्तर भारतात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडून,बर्फवृष्टी झाल्याने पुणे जिल्ह्यातही चार पाच दिवसांपासून आंबेठाण परिसरात रात्रीच्या वेळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी पडत असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले.यामध्ये अनेक शेतकऱ्यांची आंबा,कांदा, ज्वारी,हरभरा,गहू तसेच रबी पिके करपली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.गेली काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्याने शीतलहर निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.यामध्ये बटाटा,कांदा,हरभरा,ज्वारी, गहू,पालेभाज्या आदी पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आंबेठाण येथील प्रगतशील शेतकरी सचिन लक्ष्मण मांडेकर यांच्या शेतातील हिरवेगार ज्वारीचे पीक दवामुळे करपले आहे.सकाळी हिरवेगार असणारे ज्वारीचे पीक ऊन पडताच कोमेजून जाऊन संपूर्ण ज्वारीचे उभे पीक पिवळे पडले आहे.याबाबत महसूल विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली.