महाराष्ट्रातून कोटी कोटी उड्डाणे; १७ वर्षांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय-देशी विमान प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:37 PM2017-12-26T12:37:41+5:302017-12-26T12:53:44+5:30
गेल्या १७ वर्षांत सर्वाधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आघाडीवर असल्याची माहिती भारतीय विमान प्राधिकरणाने दिली आहे.
विशाल शिर्के
पुणे : देशात गेल्या १७ वर्षांत सर्वाधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रवासी आघाडीवर असल्याची माहिती भारतीय विमान प्राधिकरणाने दिली आहे. या कालावधीत देशांतर्गत प्रवासामध्ये राज्याने तब्बल १५ वर्षे अव्वलस्थान, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अकरा वर्षे अव्वलस्थान प्राप्त केले आहे. आता ती जागा देशाची राजधानी दिल्लीने घेतली आहे.
देशात हवाई उड्डाणांच्या बाबतीत दिल्ली आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक विमान झेपावत आहेत. तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकातील तफावत ही निम्मी आहे. देशांत २०००-०१मध्ये देशांतर्गत उड्डाणांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७९ लाख ६१ हजार ९६३ प्रवाशांनी विमानसेवेचा वापर केला. त्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीतून ४९ लाख ८४ हजार १५७ प्रवाशांनी विमानसेवा वापरली होती. देशांतर्गत विमानसेवा वापरण्याची महाराष्ट्राची मक्तेदारी २०१५-१६पर्यंत कायम होती. राज्यातून २०१५-१६ मध्ये ३ कोटी ७२ लाख १५ हजार ६४९ प्रवाशांनी प्रवास केला. त्या वर्षी दिल्लीतून ३ कोटी ४२ लाख ७१ हजार ९९३ प्रवाशांनी विमान प्रवास केला.
दिल्लीतून २०१६-१७ या वर्षांत ४ कोटी २२ लाख ५ हजार ७१२ प्रवाशांनी विमानसेवेचा वापर करीत राज्याची सर्वाधिक प्रवाशांची मक्तेदारी मोडून काढली. या वर्षी राज्यातून ४ कोटी १५ लाख ५ हजार ९०३ प्रवाशांनी वापर केला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटक राज्यातून २ कोटी ४३ लाख ३३ हजार ३९६ प्रवाशांनी विमानसेवा वापरली आहे.
देशांतर्गत विमान प्रवासातील अव्वल राज्य
राज्य | २००१-०२ | २००५-०६ | २०१०-११ | २०१५-१६ | २०१६-१७ |
महाराष्ट्र | ७९,६१,९६३ | १,३१,९४,२७८ | २,४३,७७,७७६ | ३,७२,१५,६४९ | ४,१५,०५,९०३ |
दिल्ली | ४९,८४,१५७ | १,०४,६८,०२८ | २,०६,६७,११३ | ३,४२,७१,९९३ | ४,२२,०५,७१२ |
कर्नाटक | २४,८७,८३१ | ५१,३६,१३२ | १,००,५१,१३९ | १,६७,८०,३१० | २,०४,३३,३९६ |
तमिळनाडू | २६,०२,८८६ | ४९,४०,८८१ | ९४,६८,२६० | १,२७,२१,७६९ | १,६१,०१,१०० |
पश्चिम बंगाल | २१,४९,२५३ | ३८,७२,१३५ | ८८,५६,५७० | १,१६,६४,१६५ | १,५०,९४,४९० |
राज्य | २००१-०२ | २००५-०६ | २०१०-११ | २०१५-१६ | २०१६-१७ |
महाराष्ट्र | ५१,७४,७१६ | ६७,६७,३४४ | ९१,७५,२०२ | १,१९,४२,०९० | १,२८,१०,३९७ |
दिल्ली | ३९,४९,६०३ | ५७,६६,६७३ | ९२,७५,७७४ | १,४१,५२,१७२ | १,५४,९७,३८४ |
केरळ | १३,५९,२६१ | २९,२६,८४४ | ६०,३१,१५५ | ८८,६७,६२५ | ९५,२१,३७४ |
तमिळनाडू | १८,९५,९४४ | २७,८१,३६० | ५०,१५,४२७ | ६४,१९,३०४ | ६८,०६,८०५ |
पश्चिम बंगाल | ६,३१,५५८ | ७,४२,२५० | १४,४९,५८७ | २१,९२,५९६ | २२,५५,५१५ |