पुरंदर उपसा सिंचनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:31 AM2018-12-20T01:31:21+5:302018-12-20T01:31:40+5:30

संजय जगताप : राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर घणाघाती आरोप

Crores of corruption in Purandar Upa irrigation | पुरंदर उपसा सिंचनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

पुरंदर उपसा सिंचनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

googlenewsNext

सासवड : पुरंदर तालुक्याला दुष्काळात वरदायिनी ठरलेली पुरंदर उपसा योजना ही शेतीसाठी बारमाही पाणी मिळण्यासाठी केली आहे. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी या योजनेचा राजकीय वापर केला आहे. शेतकऱ्यांना पैसे भरल्यानंतर पाणी मिळते; परंतु त्याची पावती दिली जात नाही, पाण्याचा आणि पैशांचा कोणताही हिशेब ठेवला जात नाही, थकबाकी झाल्यावर पैसे शासन भरते, पाणीपट्टी, वीजपट्टी, देखभाल दुरुस्तीसाठी शासन वेळोवेळी पैसे देते. तर मग शेतकºयांकडून पाण्यासाठी घेतलेले लाखो रुपये जातात कोठे, असा प्रश्न उपस्थित करून, आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्यामुळेच अधिकारी आणि सत्ताधारी मालामाल झाले असल्याचा आरोप पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर एका जाहीर कार्यक्रमात केला.

आंबोडी ( ता. पुरंदर ) येथे गाव तेथे युवक शाखा मोहीम अंतर्गत कॉंग्रेसच्या युवक शाखेचे उद्घाटन करण्यात जगताप आले होते. त्यावेळी त्यांनी शिवतारे यांच्यावर निशाना साधला. गुंजवनीच्या पाण्याच्या एका सहीसाठी तालुक्यातील जनतेने मंत्रिपद दिले, परंतु साडेचार वर्षात पाणी का आणता आले नाही. तालुक्यात दुष्काळ पडला असताना जे जनतेला स्वच्छ,शुध्द पाणी देवू शकत नाही, ते शेतीला कधी पाणी देणार? असा सवाल उपस्थित करून मला जनतेने निवडून दिल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील शेतीसाठी सहाच महिन्यात बारमाही पाण्याची व्यवस्था केली जाईल असे जाहीर केले. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण युवकचे राज्य सरचिटणीस गणेश जगताप, आंबोडीच्या सरपंच नंदिनी बोरकर, ग्रामपंचायत सदस्या मनिषा बोरकर, तालुका युवक अध्यक्ष सागर मोकाशी, उपाध्यक्ष सुशील शिवरकर, युवती अध्यक्षा रागिणी जाधव, स्वाती होले, ज्ञानेश्वरी जगताप, युवक शाखा अध्यक्ष युवराज बोरकर, माजी सरपंच नवनाथ मोरे, सासवडचे माजी नगराध्यक्ष विजय वढणे, अक्षय भांडवलकर, तुषार बोरकर, दत्तात्रय बोरकर, महेश बोरकर, त्याच प्रमाणे युवक शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच नंदिनी बोरकर यांनी गावात पिण्यास पाणी नसताना आणि त्यांकारचा प्रस्ताव देवूनही पाणी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला. गावातील रस्ते खराब झाल्याचे भाषणातून सांगितले. यावेळी काकासाहेब शिवरकर, स्वप्नील शिवरकर, यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच नवनाथ मोरे यांनी प्रास्ताविक केले, विकास इंदलकर यांनी सूत्रसंचालन केले. यावळी ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवतारेंना पोलीस संरक्षण कशासाठी?
४जनतेने शिवतारेना मंत्री केले, पण मंत्री फेसबुक वरून अश्लील शब्दप्रयोग करीत असल्याने त्यांची पातळी जनतेला चांगलीच समजली आहे अशा शब्दात जगताप यांनी समाचार घेतला.
४राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्राचे कृषिमंत्री, संरक्षण मंत्री असतानाही शरद पवार यांना जेवढी पोलीस सुरक्षा लागत नाही, त्यापेक्षा जास्त पोलीस घेवून हे महाशय फिरतात, त्यामुळे जनतेत फिरताना आणि स्वत:च्या घरी जाताना शिवतारेना पोलीस संरक्षण का लागते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Web Title: Crores of corruption in Purandar Upa irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.