कोट्यावधींचे रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 16:51 IST2018-04-26T16:51:57+5:302018-04-26T16:51:57+5:30
चेन्नईहून मुंबईच्या दिशेने रक्तचंदन घेऊन कंटेनर निघाला होता.

कोट्यावधींचे रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर जप्त
ठळक मुद्देरक्तचंदन सुमारे १० कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज
पिंपरी :बेकायदेशीररित्या रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर वाकडमध्ये पोलिसांनी पकडला. या कंटेनरमध्ये सुमारे १० कोटींचे रक्तचंदन असल्याचे पोलिसांनी सांगितले. चेन्नईहून मुंबईच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता. दरम्यान, या कंटेनरची माहिती वाकड पोलिसांच्या पथकास मिळाली. पोलिसांनी द्रुतगती महामार्गावर सापळा रचला. गुरुवारी सकाळी ताथवडे येथे कंटेनर आला आणि पोलिसांनी तो अडवला. त्यामध्ये पाहणी केली असता रक्तचंदन आढळून आले. पोलिसांनी वनविभास कळवले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर यामध्ये हे रक्तचंदन सुमारे १० कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे