४ महिन्यांत कोटींचे उड्डाण

By admin | Published: May 6, 2017 02:33 AM2017-05-06T02:33:59+5:302017-05-06T02:33:59+5:30

लोहगाव ग्रामपंचायतीला नव्याने बांधलेल्या घरांच्या नोंदणीतून १ कोटी ८८ लाख ७४ हजार २०९ रुपये मिळाले आहेत. ४ महिन्यांतच

Crores flight within 4 months | ४ महिन्यांत कोटींचे उड्डाण

४ महिन्यांत कोटींचे उड्डाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : लोहगाव ग्रामपंचायतीला नव्याने बांधलेल्या घरांच्या नोंदणीतून १ कोटी ८८ लाख ७४ हजार २०९ रुपये मिळाले आहेत. ४ महिन्यांतच हे उत्पन्न मिळाले आहे.
ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली घरांची अनधिकृत बांधकामे व या बांधकामांची ग्रामपंचायत दफ्तरी होत असलेली नोंद यामुळे एकप्रकारे अनधिकृत बांधकांमाना अभय मिळत होते.
यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाल्याने अशा ठिकाणी सोयी-सुविधा पुरवणे अवघड
बनले होते व ही बाब शासनासाठी डोकेदुखी ठरली होती.
अनधिकृत बांधकामांना आळा बसावा, यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींना नवीन घरांच्या नोंदी करण्याचे अधिकारच काढून घेतले होते. मात्र यामुळे घरांचा बांधकाम कर व घरपट्टीतून ग्रामपंचायतींना मिळणारा मोठा निधी बंद झाला. त्यामुळे ग्रामपंचायतींना घरांच्या नोंदी करण्याचे अधिकार पुन्हा  देण्याची मागणी जोर धरू  लागल्याने शासनाने ग्रामपंचायतींना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे अधिकार पुन्हा बहाल केले.

५ हजार घरांची नव्याने नोंद
लोहगाव परिसरात झालेली बांधकामे व बांधकाम प्रकल्प अशा एकूण ५८२ मिळकतींची ग्रामपंचायत दफ्तरी मागील ४ महिन्यांत नोंद करण्यात आली आहे. नोंद झालेल्या ५८२ मिळकती असल्या तरी यामध्ये बांधकाम प्रकल्पही आहेत. त्यामुळे या प्रकल्पांतील सदनिकांचा विचार करता प्रत्यक्षात ४ ते ५ हजार घरांची नव्याने नोंद करण्यात आली आहे. या सर्व मिळकतींना जमिनींच्या रेडिरेकनर भांडवली दरानुसार मिळकतकर व नोंदणी शुल्क आकारण्यात येत असल्याने महसुलात वाढ झाल्याचे लोहगावचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढवळे यांनी सांगितले.

Web Title: Crores flight within 4 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.