पावणोचार कोटींची फसवणूक
By admin | Published: November 15, 2014 12:03 AM2014-11-15T00:03:38+5:302014-11-15T00:03:38+5:30
हिम्बज हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आकर्षक टूर पॅकेज व गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून 3 कोटी 82 लाख 13 हजार 792 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.
Next
पुणो : हिम्बज हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आकर्षक टूर पॅकेज व गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून 3 कोटी 82 लाख 13 हजार 792 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.
आर्थर रोड तुरुंगातून त्यांना प्रॉडय़ूस वॉरंटद्वारे हिंजवडी येथे दाखल गुन्ह्यात वर्ग करून अटक करण्यात आली. हिम्बज कंपनीने महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर 3क्क् कोटींची फसवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. न्यायालयाने त्यांना 2क् नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
गणोश बाळू शिंदे (वय 33, रा. काळेवाडी, मुंबई), किरण सुधाकर आरेकर (वय 29, रा. नेवरे, र}ागिरी), दिनेश बळवंत सपकाळ (वय 36, रा. र}ागिरी), युवराज सतप्पा पाटील (वय 32, रा. लालबाग, मुंबई), राजन मच्छिंद्र चाकणो (वय 34, रा. शिवडी, मुंबई), महेश दत्तराम पालकर (वय 37, रा. र}ागिरी), यमचंद्र नारायण बनसोडे (वय 36), प्रभाकर धाकटोबा दळवी (वय 36, दोघे रा. र}ागिरी), मंगेश मधुकर शेर्लेकर (वय 32, रा. सिंधुदुर्ग), गुरूनाथ जनार्दन सावंत (वय 33, रा. सिंधुदुर्ग), संतोष तुकाराम काजरोळकर (वय 42, रा. र}ागिरी) अशी आरोपींची नावे आहेत. हा प्रकार 8 जून 2क्12 ते 15 डिसेंबर 2क्12 या काळात थेरगाव येथील हिम्बज हॉलिडेजच्या कार्यालयात घडला.
याप्रकरणी समीर श्रीरंग जाधव (वय 33, रा. हिंजवडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा तपास केला असता त्यात पावणोचार कोटींबरोबरच पुन्हा 1 कोटी 11 लाख 12 हजार रुपयांची फसगतही समोर आली आहे. (प्रतिनिधी)