चाकणची वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपयुक्त रस्त्यासाठी साडेबारा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:40 AM2018-12-16T01:40:58+5:302018-12-16T01:41:22+5:30

शरद बुट्टे-पाटील : जिल्ह्यातील सगळ्यांत मोठा निधी मंजूर

Crores of rupees for a suitable road to avoid Chakan traffi | चाकणची वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपयुक्त रस्त्यासाठी साडेबारा कोटी

चाकणची वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपयुक्त रस्त्यासाठी साडेबारा कोटी

Next

आंबेठाण : चाकणची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाºया भाम फाटा ते बिरदवडी- आंबेठाण- म्हाळुंगे या ग्रामीण ११ च्या ७ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी पीएमआरडीएने १२ कोटी ४४ लाख रुपये मंजूर केले आहेत. जिल्ह्यातील सगळ्यात मोठा निधी खेड तालुक्यातील या रस्त्यासाठी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चाकण भागातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने शहरातील प्रमुख चौकांसह महामार्गावर सतत वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीवर भाम फाटा ते म्हाळुंगे रस्ता रुंदीकरण हे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० ला जोडणाºया ग्रामीण मार्ग ११ हा इजिमा ५८, प्रजिमा २० छेदतो व पुढे तो प्रजिमा १८ ला जाऊन मिळतो. हा मार्ग बिरदवडी, आंबेठाण व म्हाळुंगे या प्रमुख तीन गावांना जोडतो आहे. तिन्ही गावांमध्ये मोठ्या संख्येने कारखानदारी असल्याने नाशिककडे व तळेगाव- मुंबईकडे जाणाºयांना हा रस्ता जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण होणे गरजेचे होते. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांनी रस्तादुरुस्तीची मागणी केली होती. यावेळी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, माजी जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, आंबेठाणचे सरपंच दत्तात्रय मांडेकर, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, दिलीप वाळके, हभप एकनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य मोहन पवार, भानुदास पवार आदींसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाम ते बिरदवडी,आंबेठाण व म्हाळुंगे हा खेड तालुक्यातील महत्त्वाचा औद्योगिक व बाजारपेठेला जोडणारा आहे. या सात किलोमीटरच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणे, गरजेच्या ठिकाणी सिमेंट-काँक्रिटीकरण करणे, रस्त्याच्या साइडपट्ट्या भरणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारखोदाई करणे, आवश्यकता असलेल्या ठिकाणी मोºया करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Crores of rupees for a suitable road to avoid Chakan traffi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.