पेट्रोल शंभर पार, आता तरी लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:51+5:302021-05-24T04:09:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खाद्यतेलापाठोपाठ पेट्रोल, डिझेल अशा इंधनाचा दरही लिटरमागे शंभर रुपयांच्या पार झाला आहे. मोदीजी, आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खाद्यतेलापाठोपाठ पेट्रोल, डिझेल अशा इंधनाचा दरही लिटरमागे शंभर रुपयांच्या पार झाला आहे. मोदीजी, आता तरी ही जनतेची लूट थांबवा, अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आटोपताच सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे भाव वाढवायला सुरुवात केली आहे. देशभरात काही शहरांत पेट्रोलचा डिझेलचा दर शंभर रुपयांच्या पुढे गेला आहे. पुण्यातही पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९ रुपये आणि डिझेलचा दर ९० रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचला आहे.
सध्या खाद्यतेलांचे दर लिटरमागे २५-३० रुपयांनी गेला महिनाभरात वाढले आहेत. त्यातच इंधन दरवाढीची भर पडली आहे. वर्षभरात खाद्यतेले लिटरमागे ४०ते ५० रुपयांनी महागली आहेत. साखर, तांदूळ, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढताहेत आणि आगामी काळात आणखी भडकतील अशी शक्यता बाजारपेठांमध्ये व्यक्त केली जात आहे. सामान्य नागरिकांचे जीवनमान अधिक बिकट होत चालले आहे, नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.