चाकण बाजारपेठेत पुन्हा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:36+5:302021-06-01T04:08:36+5:30
चाकण पालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.मागील दोन महिन्यांत कोरोनाचा चढता आलेख आता उतरणीला ...
चाकण पालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.मागील दोन महिन्यांत कोरोनाचा चढता आलेख आता उतरणीला लागल्याचे दिसून येत आहे. संचारबंदीसह लावण्यात आलेला लॉकडॉऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला असला, तरी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतरही व्यवसाय ठराविक वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चाकण पालिका हद्दीतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. रोजच्या तीन आकडी संख्येतील रुग्णसंख्या दोन आकड्यात आल्याने नागरिक काही प्रमाणात बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.
चाकण तरकारी बाजारासह जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. सकाळी ९ ते ११ वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी असल्याने लोकही याच काळात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यामध्ये अनेक जण विनामास्क फिरत आहेत. अशाच नागरिकांचा हलगर्जीपणा महागात पडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि पालिकेने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत होती. पण, कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याने या कारवाईमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्याने अनेक व्यावसायिक वेळेचे बंधन पाळत नाहीत. अनेक नागरिक व व्यावसायिक संध्याकाळी चार नंतर घराबाहेर पडत आहे तर अनेक जण आपली दुकाने सुरू करत आहेत.तर सकाळी खरेदीसाठी गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. याकडे प्रशासनाने वेळेचं लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
३१ चाकण
चाकण बाजारपेठेतील गर्दी.
===Photopath===
310521\31pun_3_31052021_6.jpg
===Caption===
३१ चाकण चाकण बाजारपेठेतील गर्दी.