भुलेश्वरी मंदिर येथे भाविकांची गर्दी
By admin | Published: June 27, 2017 07:40 AM2017-06-27T07:40:04+5:302017-06-27T07:40:04+5:30
संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेल्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वरी सलगच्या तीन
लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेल्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वरी सलगच्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे असंख्य भाविकांनी गर्दी केली व शिवलिंगाचे दर्शन घेतले.
शनिवार, रविवार व रमजान ईदची सलग तीन दिवस सुटी असल्याने भुलेश्वरी असंख्य भाविकांनी गर्दी केली. नारायणपूरचा दत्तमहाराज, जेजुरीचा खंडोबा, पांडेश्वरचा पांडेश्वर आदी तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन भाविक भुलेश्वरी येत होते. मंदिरातील मुख्य पुजारी दादा गुरव यांनी शिवलिंगाची आकर्षक पूजा केली होती. भाविकांमध्ये महिलांची उपस्थिती अधिक होती. भुलेश्वर मंदिर आज भाविकांनी फुलून गेले.