जुन्नरच्या गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By admin | Published: July 5, 2017 03:12 AM2017-07-05T03:12:02+5:302017-07-05T03:12:02+5:30

बांगरवाडी येथे आज आषाढी एकादशीनिमित्त श्री गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी सकाळपासून

A crowd of devotees for a glimpse of Junnar's secret Vithoba | जुन्नरच्या गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जुन्नरच्या गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Next

 जुन्नर : बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे आज आषाढी एकादशीनिमित्त श्री गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 
याठिकाणी आषाढी एकादशीला दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. श्री गुप्त विठोबा देवस्थान डोंगराच्या कडेला निसर्गाच्या सानिध्यात जमिनीखाली खडकातील भुयारात आहे. याठिकाणी जमिनीवरही ग्रामस्थांच्यावतीने भव्य मंदिर बांधण्यात आलेले आहे. आषाढी एकादशीला या ठिकाणी विठ्ठल - रुक्मिणी सेवा मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महापूजा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर सर्व भाविकांसाठी केळी व साबुदाण्याच्या खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दरम्यान दुपारी पंचक्रोशीतील गावांतून येणाऱ्या भाविकांच्या पायी दिंडी सोहळ्यांचे स्वागत करण्यात येते.

Web Title: A crowd of devotees for a glimpse of Junnar's secret Vithoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.