धानोरी-कळसमध्ये दुपारनंतर वाढली मतदानासाठी गर्दी

By admin | Published: February 22, 2017 03:13 AM2017-02-22T03:13:05+5:302017-02-22T03:13:05+5:30

प्रभाग क्रमांक १ धानोरी-कळसमधील मतदान शांततेत पार पडले. धानोरीतील कै. बाबूराव माधवराव टिंगरे

The crowd gathered for the voting on the edge of Dhanori-Kalyan | धानोरी-कळसमध्ये दुपारनंतर वाढली मतदानासाठी गर्दी

धानोरी-कळसमध्ये दुपारनंतर वाढली मतदानासाठी गर्दी

Next

पुणे : प्रभाग क्रमांक १ धानोरी-कळसमधील मतदान शांततेत पार पडले. धानोरीतील कै. बाबूराव माधवराव टिंगरे शाळेमध्ये सकाळच्या वेळेत तुरळक गर्दी होती. सकाळी या भागातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी मतदान करून कार्यालय गाठले. दुपारनंतर हळूहळू गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. एका बॅलेटवर दोन गट असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अशा मतदारांना निवडणूक कर्मचारी माहिती देऊन मदत करीत होते. सर्व गटांतील उमेदवारांना मतदान केल्याशिवाय सायरन वाजत नसल्याने पहिल्या बॅलेटवरचे बटण दाबल्यानंतर आवाज येत नसल्याने आपले मतदान झाले नाही, असे अनेकांना वाटले.
मुंजाबावस्तीतील नारायणराव ग्यानबा मोझे महाविद्यालयातही मतदान सुरळीत पार पडले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. शाळेतील काही खोल्यांच्या काचा तुटलेल्या असल्याने, पुरेशी प्रकाशव्यवस्था व स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये छोट्या खोल्या असल्याने व दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्णता जाणवत होती. या ठिकाणीही मतदान सुरळीत पार पडले.
कळस भागातील मनपा शाळा क्र. १७० बी तसेच ट्रिनिटी हायस्कूलमध्येही शांततेत मतदान पार पडले. विश्रांतवाडीतील बॅ. विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक विद्यालयात दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. मतदानाची वेळ संपण्यासाठी काही तास उरले असल्याने नागरिकांनी या शाळेत गर्दी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. वयोवृद्ध नागरिक व महिलांना या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले. मतदान कुठल्या खोलीत आहे, याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसल्याने नागरिक इकडेतिकडे फिरताना दिसून आले. जिन्यातही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. गर्दीमुळे अनेक महिलांचा श्वासही कोंडला. पोलिसांनाही काही काळ गर्दीला सांभाळणे अवघड जात होते.

Web Title: The crowd gathered for the voting on the edge of Dhanori-Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.