थंडीमुळे लक्ष्मीरस्त्यावर वाढली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 04:16 PM2018-11-15T16:16:43+5:302018-11-15T16:18:50+5:30
लक्ष्मी रस्त्यावर स्वेटर, जॅकेट्स विकण्याचे माेठ्याप्रमाणावर स्टाॅल असल्याने अाता हळूहळू नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली अाहे.
पुणे : यंदा काहीसा उशीर झाला असला तरी शहरात काही दिवसांपासून थंडी जाणवण्यास सुरुवात झाली अाहे. खासकरुन सकाळी अाणि रात्रीच्या वेळी शहरातील वातावरणात थंडी जाणवत अाहे. बाेचऱ्या थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वेटर अाणि जर्किंग घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर स्वेटर, जॅकेट्स विकण्याचे माेठ्याप्रमाणावर स्टाॅल असल्याने अाता हळूहळू नागरिकांची गर्दी या ठिकाणी वाढू लागली अाहे.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील विजय टाॅकीज जवळील भाग हा स्वेटर, जॅकेट्स खरेदीसाठी प्रसिद्ध अाहे. या ठिकाणी माेठ्याप्रमाणावर या स्वेटर्सची विक्री करणारे स्टाॅल्स अाहेत. या स्टाॅल्सवर सध्या रंगबेरंगी तसेच विविध अाकारांचे स्वेटर्स तसेच जॅकेट्स पाहायला मिळत अाहेत. त्यातही स्वेटशर्टचे प्रमाण या ठिकाणी अधिक अजून त्याला नागरिकांचा माेठा प्रतिसाद मिळत अाहे. शहरातील पेठांमधील नागरिकांबराेबरच उपनगरांमधील नागरिकही या ठिकाणी स्वेटर घेण्यासाठी गर्दी करत अाहेत. दुकानांमधील किंमतीपेक्षा कमी किंमतीत येथे स्वेटर मिळतात. त्याचबराेबर हव्या त्या प्रकराचे तसेच हव्या त्या रंगाचे स्वेटर येथे मिळत असल्याने थंडी सुरु झाली की नागरिकांची पाऊले अापाेअाप लक्ष्मीरस्त्याकडे वळतात.
स्वेटर्स बराेबरच चहाच्या टपऱ्यांवरही नागरिक सकाळच्यावेळी गर्दी करत अाहेत. कामासाठी जाणारे नागरिक तसेच व्यायामावरुन घरी परतणारे नागरिक चहाचा अास्वाद घेत असल्याचे चित्र सकाळी पाहायला मिळत अाहे.