वाईतील मांढरदेव काळूबाईदेवीच्या यात्रेला पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:23 PM2018-01-02T18:23:56+5:302018-01-02T18:28:18+5:30
मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीची यात्रा मंगळवार (दि. २) पासून सुरू झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक-भक्तांची गर्दी झाली आहे.
नेरे : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीची यात्रा मंगळवार (दि. २) पासून सुरू झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक-भक्तांची गर्दी झाली आहे. पहाटे ५ वाजता देवीची महापूजा जिल्हा सत्र न्यायाधीश, सातारा यांच्या हस्ते करण्यात आली.
काळूबाईदेवीच्या यात्राकाळात भोर प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथक, महसूल विभाग, महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. भोर विभागातून खासगी वाहनातून वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आंबडखिंड (ता. भोर) घाटाच्या पायथ्याशी सुरुवातीलाच पोलिसांकडून वाहने तपासणी केली जात आहे.
पशुहत्याबंदी असल्याने वाहनांमध्ये पशू किंवा सरपण सापडल्यास आंबडखिंडच्या वाहनतळावरच काढून ठेवले जात आहे. मांढरदेवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर शंकर क्षीरसागर यांच्याकडून सांगण्यात आले.
दुपारी एकपर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली असून संध्याकाळपर्यंत दोन लाखांच्या पुढे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.