Pune: दहिहंडीनिमित्त शहरात नागरिकांची गर्दी; जाणून घ्या पीएमपी बसच्या मार्गातील 'हा' बदल
By अजित घस्ते | Published: September 5, 2023 09:19 PM2023-09-05T21:19:43+5:302023-09-05T21:20:53+5:30
पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहून सचंलनात असलेल्या पीएमपी बसच्या मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करून बस संचलन सुरू ठेवण्यात येणार
पुणे : दहिहंडी उत्सव गुरूवारी (दि. ७) आहे. ताे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहून सचंलनात असलेल्या पीएमपी बसच्या मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करून बस संचलन सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. तसेच पीएमपीने केलेल्या बदलाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील पीएमपी प्रशासनाने केले आहे.
पीएमपीच्या वाहतुकीत असा असेल बदल
- बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. ११३ अ. ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर मनपा भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. १७४ ही बस गुरुवार आणि शुक्रवारी (दि. ७) रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) मनपा, डेक्कन मार्गे संचलनात राहील.
- बस मार्ग क्र. २, २ अ, १०, ११, ११ अ, ११ क, १३, १३ अ, २८, ३०, २०, २१, ३७, ३८, ८८, २१६, २९७, २९८, ३५४, रातराणी-१, मेट्रो शटल-१२ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. स्वारगेटकडून शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बस बाजीराव रोडने संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. ७, १९७, २०२ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
- बस मार्ग क्र. ६८ या मार्गाचे बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
- स्वारगेट आगाराकडून बस मार्ग क्र. ३ व ६ हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.