मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी
By admin | Published: June 26, 2017 03:49 AM2017-06-26T03:49:17+5:302017-06-26T03:49:17+5:30
मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठा सण असलेल्या रमजान ईदच्या तयारीसाठी मुस्लिम बांधव नवीन कपडे, सुका मेवा, सुगंधी द्रव्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
नेहरुनगर : मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठा सण असलेल्या रमजान ईदच्या तयारीसाठी मुस्लिम बांधव नवीन कपडे, सुका मेवा, सुगंधी द्रव्ये (अत्तर) व इतरही खरेदीसाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती.
रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. मुस्लिम बांधवांकडून गेल्या महिन्यापासून नमाज रोजे सुरू आहेत. रमजान ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवात मोठा उत्साह दिसून येत आहे. ईदनिमित्त मुस्लिम बांधव नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी करीत आहेत. कपड्यांमध्ये नमाजपठणासाठी लागणारी पठाणी सलवार-कुर्ता, पायजमा व इतर पांढऱ्या वस्त्रांना जास्त पसंती देत आहेत. महिलादेखील विविध प्रकारच्या नक्षीदार साड्या रंगबेरंगी पंजाबी अनारकली, मस्तानी, फेन्सी ड्रेस कुर्ता या कपड्यांना पसंती देत आहेत. यामुळे पिंपरी येथील कपड्यांच्या बाजारपेठेमध्ये या कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.