निमोणे येथे लसीकरणासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:14+5:302021-05-06T04:11:14+5:30
लसीचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरणामध्ये खंड पडतो. बुधवारी १७० डोस प्राप्त झाल्याने ४५ वयोगटापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ...
लसीचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरणामध्ये खंड पडतो. बुधवारी १७० डोस प्राप्त झाल्याने ४५ वयोगटापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, यावेळी शिरूर शहरासह तालुक्याच्या विविध गावच्या नागरिकांनी लसीसाठी धाव घेतल्याने मोठी गर्दी जमली होती. नियोजनाच्या अभावामुळे हमरातुमरीचे अनेक प्रकार घडले. काही अती उत्साहींनी तर दरवाजालगतच तळ ठोकला त्यामुळे आतमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले होते. मर्यादित डोस असल्यामुळे अनेक जणांना लस मिळाली नाही. दरम्यान, कोव्हॅकस्निचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी लसीची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी इंदिरा डॅनियल म्हणाल्या की, नियमानुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
०५ निमोणे
लसीकरण केद्राबाहेर नागरिकांनी केलेली गर्दी.