वडगावात सकाळपासून गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:31 AM2020-12-04T04:31:40+5:302020-12-04T04:31:40+5:30
राज्य शासनाने मंदिरे दर्शनासाठी सुरू केल्यानंतर ही पहिलीच संकष्टी चतुर्थी होती. त्यामुळे भाविकांनी सकाळपासून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. ...
राज्य शासनाने मंदिरे दर्शनासाठी सुरू केल्यानंतर ही पहिलीच संकष्टी चतुर्थी होती. त्यामुळे भाविकांनी सकाळपासून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
पहाटे महापूजा त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून भाविकांना देवस्थानच्या वतीने सूचना करण्यात येत होत्या. मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्याचे पालन भाविकांनी केले .सायंकाळी गर्दीत काहीशी वाढ झाली. त्यावेळीही सोशल डिस्टनचे पालन फरक दर्शन घेण्यात आले. मंदिर पायथ्याशी भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती .त्यामुळे वाहनांचे पार्किंग सुलभ झाले.मंदिरा समोरील सभामंडपात यावेळी प्रथमच भाविकांना बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे दर्शन झाल्यानंतर भाविक लगेच माघारी परतत होते. दुपारी तीन वाजता व सायंकाळी सात वाजता आरती संपन्न झाली. श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टने व्यवस्था पाहिली.
--
फोटो : ०३ मंचर वडगाव काशिंबेग गणपती
फोटोखाली: वडगाव काशिंबेग ( ता.आंबेगाव) येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपतीचे भाविकांनी नियमाचे पालन करत दर्शन घेतले.