गुन्हेगारी टोळ््यांच्या आवळल्या मुसक्या
By admin | Published: December 22, 2015 01:34 AM2015-12-22T01:34:27+5:302015-12-22T01:34:27+5:30
जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ््यांवर वचक बसविण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी १४ टोळ््यांमधील तब्बल १२४ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करून
पुणे : जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ््यांवर वचक बसविण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी १४ टोळ््यांमधील तब्बल १२४ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करून मुसक्या आवळल्या आहेत. यापुढेही जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी टोळ््यांवर कारवाई सुरूच राहील, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ग्रामीणच्या अधीक्षकपदाची मे २०१५ मध्ये सूत्रे हातात घेतली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी १४ गुन्हेगारी टोळ््यांमधील तब्बल १२४ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. आगामी काळात आणखी चार गुन्हेगारी टोळयांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये राम बाळू केदारी (रा. कोथरूड), पिंट्या ऊर्फ सुनील दीपक वाघमारे (रा. लोणावळा), शाम रामचंद्र दाभाडे (रा. तळेगाव दाभाडे), संतोष कांतिलाल गुजर (रा. चाकण), प्रवीण मारुती कुंजीर (रा. लोणी काळभोर), पप्पू गणपत उत्तेकर (रा. पौड), महेश चंद्रकांत कमलापुरे (रा. पुणे), रोहिदास अनंता चोरगे (रा. वेल्हा), सागर दादा कामठे (रा. करमाळा), सोबत हिमला मछार (रा. छाबुवा, मध्य प्रदेश), तुषार नामदेव हंबीर (रा. हडपसर), सागर कल्याण रजपूत (रा. पुणे) आणि विजय तुळशीराम चव्हाण (रा. ठाणे) यांच्या टोळ््यांतील गुन्हेगारांचा समावेश आहे.
तसेच भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख
सागर कल्याण रजपूत व संजय भीमराव रजपूत यांनी वाळूतस्करीच्या वादातून खून केला होता. त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी मंजुरी मिळाली असून तपास चालू आहे.
भविष्यात अशा प्रकारची गुन्हेगारी टोळी करून घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा अधिक सखोल तपास करणार असल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्याविरुद्ध
कडक कारवाई करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)