वर्षाअखेर निमित्त कर्ज भरण्यासाठी बँकेमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:17+5:302021-03-31T04:11:17+5:30
चालू आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी जवळपास आजचा अखेरचा दिवस आहे. उद्या ३१ मार्चला बँका सुरू असल्या, ...
चालू आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी जवळपास आजचा अखेरचा दिवस आहे.
उद्या ३१ मार्चला बँका सुरू असल्या, तरी हा दिवस बँकेच्या अंतर्गत आर्थिक व्यवहारासाठी नागरिकांसाठी कमी वेळ दिला जातो. आर्थिक व्यवहार पूर्ण करणे, शेतीसाठी विविध सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज परत करण्यासाठी ३० मार्च हाच दिवस महत्वाचा असतो.
मागील तीन दिवसापासून शनिवारी, रविवारी व सोमवारी धूलिवंदनाची सुटी आल्याने बँकांना सुट्टी होती. असे असले तरी बँकांनी सोसायटी कर्ज भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. या कारणासाठी बँका सुरु ठेवल्या होत्या. मात्र इतर आर्थिक व्यवहार बंद असल्याने व्यवहारावर मर्यादा येत होत्या. मात्र आज बँका पूर्ण क्षम तेने सुरु असल्याने आज बँकांमध्ये सकाळपासूनच गर्दी असल्याचे पहावयास मिळत होते. ग्रामीण भागातील बँका मध्ये आज सोसायटी कर्ज भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्या होत्या.
--
३०अवसरी बॅंक
ओळी : वर्षा अखेरचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी आज ग्रामीण भागातील बँकांमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.