नवीन वर्षात थेऊरमध्ये भाविकांची गर्दी तर स्थानिक व्यावसायिक उत्साहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:16+5:302021-01-03T04:13:16+5:30
राज्यशासनाचे निर्बंध असल्याकारणाने मंदिर परिसरात नित्यनेमाने होणारे प्रसाद वाटप झाले नाही. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज ...
राज्यशासनाचे निर्बंध असल्याकारणाने मंदिर परिसरात नित्यनेमाने होणारे प्रसाद वाटप झाले नाही. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला होता.कोरोनाच्या धर्तीवर काळजी घ्यावी म्हणून देवस्थानने जागोजागी सॅनिटायझर स्टँड उभे केले होते. सोशल डिस्टनसिंग पाळले जावे याकरिता चौकोन आखण्यात आले होते.तसेच माईकवरून विविध सूचना वेळोवेळी भाविकांसाठी देण्यात येत होत्या. या सर्व व्यवस्थेवर हभप आनंद महाराज तांबे व डॉ पोफळे लक्ष ठेवून होते.रात्री चंद्रोदयानंतर मंदिर परिसरात श्रींचा छबिना काढण्यात आला.
चौकट
स्थानिक व्यावसायिकांना दिलासा
मागील वर्षभरापासून कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने बाहेरील भाविक दर्शनासाठी येत नसल्याने स्थानिक व्यावसायिकांचे हाल होऊ लागले होते परंतु या नवीन वर्षात पुन्हा एकदा भाविकांनी हजेरी लावल्याने स्थानिक व्यावसायिकांची गल्ली पुन्हा एकदा व्यवसाय करण्यास सज्ज झाली आहे.यासर्वांतर्फे योग्य ती काळजी घेतली गेल्याचे चित्र दिसत होते.
फोटो : ०२थेऊर भाविकांमध्ये चिंतामणी गणपती