कोरोना चाचणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:38 AM2020-11-22T09:38:06+5:302020-11-22T09:38:06+5:30
पुणे : राज्य शासनाच्या निर्णयानुसार २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याने, महापालिकेच्या १८ केंद्रांसह खाजगी लॅबमध्ये शिक्षक व ...
पुणे : राज्य शासनाच्या निर्णयानुसार २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याने, महापालिकेच्या १८ केंद्रांसह खाजगी लॅबमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोना चाचणी करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचे दिसून आले आहे़
कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्यता, दिवाळीनंतरच्या तपासणीत झालेली वाढ व कोरोना पॉझिटिव्हची वाढलेली टक्केवारी, यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला अशी भिती निर्माण झाली आहे़ परंतु, सध्या कोरोनाची वाढलेल्या चाचण्या या शहरातील शाळांमधील बहुतांशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या तपासणीमुळे वाढल्याचे आढळून आले आहे़
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़आशिष भारती यांनी, शहरात अद्याप तरी कोरोचा दुसरी लाट येईल असे भाकित करणे योग्य राहणार नसल्याचे सांगितले आहे़ हवामानातील बदलामुळे सर्दी खोकल्याचे वाढलेले रूग्ण खबरदारी म्हणून तपासणी करून घेत आहेत़ यामुळे तपासणीचे प्रमाण वाढले असले तरी, चार-पाच दिवसांमधील कोरोनाबाधितांच्या वाढीवर कोरोनाच्या दुसºया लाटेचा अंदाज वर्तविता येणार नाही़
महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाच्या संभाव्य दुसºया लाटेच्या अनुषंगाने पूर्ण तयारीत असून, आजमितीला महापालिकेच्या सर्व रूग्णालये, कोविड सेंटर सर्व सुविधांनी सज्ज आहेत़ कोविड-१९ च्या रूग्णांकरिता सद्यस्थितीला शहरातील सरकारी रूग्णालयातील १ हजार ७५७ तर खाजगी हॉस्पिटलमधील ३ हजार ७३८ खाटा उपलब्ध आहेत़
---
खाजगी रूग्णालयेही स्वत:हून पुढे आली
कोरोनाच्या संभाव्य दुसºया लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील ८३ खाजगी रूग्णालयांनी महापालिकेला पुन्हा आवशक्यता भासल्यास, लागलीच आपल्याकडील सर्व प्रकारच्या खाटा (आॅक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड) उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे़
सप्टेंबर महिन्यात ज्या खाजगी रूग्णालयांमधील खाटा कोविड-१९ च्या रूग्णांना मिळाव्यात यासाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागली होती़ त्याच ८३ खाजगी रूग्णालयांनी आजमितीला स्वत:हून खाटा देण्याची तयारी लेखी पत्राव्दारे दाखविली असल्याचे समाधानकारक चित्र शहरात आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़मनिषा नाईक यांनी दिली़